पारनेर तालुक्यातील वडझिरेचे नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील मूळ असणारे पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

नवनाथ ढवळे २०१५ – १७ या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दला ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या.

त्यातील मे २०१७ मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळे यांनी त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला.

उसेंडी हिच्यावर १३९ गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी १६ लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल बाला तास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती.

या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. मूळ पारणेर तालुक्यातील वडझिरे येथील असलेल्या ढवळे यांनी कऱ्हाडलाही उत्तम कामगिरी केली होती.

त्यानंतर चिपळूणला पोलीस उपाधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe