‘त्या’ तालुकाध्यक्षावर राष्ट्रवादीने कारवाई करावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अकोले येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या समोर त्यांचा कार्यकर्ता असे कृत्य करतो, त्यांचा बोलविता धनी आ.डॉ.किरण लहामटे हेच आहेत, असा आरोप करीत हे महाआघाडीच्या तत्वाला घातक आहे.

या तालुकाध्यक्षाचा राजीनामा घेऊन त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ने कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर कोणत्याच पातळीवर काम करणार नाही, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी दिला.

येथील शासकीय विश्रामगृह येथे अयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, बाळासाहेब नाईकवाडी, रमेशराव जगताप, चंद्रभान निरगुडे, शंकरराव वाळुंज, अरीफभाई तांबोळी, शिवाजी नेहे,

संपतराव कानवडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, रामदास धुमाळ, साईनाथ नवले, उबेद शेख आदी उपस्थित होते. यावेळी नवले म्हणाले की, ना. थोरात यांच्या बैठकीत जाणून बुजून गोंधळ घालून बैठक हाणून पाडण्याचा डाव होता.

व त्याचे समर्थन डाव्या विचारसरणीच्या नेत्याने करावे ही आश्चर्याची बाब आहे. ना.थोरात यांनी अकोले संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही, त्यांनी तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहे.

आपणच एकटे आंदोलन करतो या आविर्भावात कोणी अहंकार ठेवून सांगू नये. आ. लहामटे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावे. मित्र पक्ष म्हणविता आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाला डावलण्याचा प्रयत्न करता ही बाब योग्य नाही,

अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा नवले यांनी दिला. पांडे म्हणाले, जेव्हा मंत्री तालुक्यात येतात त्यावेळी त्यांचे स्वागत आमदार यांनी करणे गरजेचे आहे, हा प्रोटोकॉल आहे.

तुम्हाला मिटिंग माहित असताना तुम्ही उशिरा का आले? पारनेरचे आमदार निलेश लंके राज्य पातळीवर मंत्री यांचे कडे पाठपुरावा करून कोरोना ग्रस्तांसाठी चांगले काम करू शकतात मग तुम्हाला हे काम जमत नाही?, असा सवाल विचारला. आभार शिवाजी नेहे यांनी मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe