अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त पदी निवड झाली, म्हणून राष्ट्रवादीच्या 6 नेत्यांची नावे काल सोशल मीडियावर वेगात फिरत होती.
मात्र,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी अशी निवड झाली नसल्याचे सांगितल्याने संभ्रम वाढला होता, त्यात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही’ ही नावे चुकीची आहेत’,
अशी माहिती एका पोस्टवरील प्रतिक्रियेतून दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचाली सुरू आहेत.
मात्र, काल सोशल मीडियावर विश्वस्त पदी निवड झाली, म्हणून अनेक नावे वेगात फिरत होती. यात राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे अध्यक्ष, तर अजित कदम,
पांडुरंग अभंग, संग्राम कोते, संदीप वर्पे, अनुराधा आदिक यांना राष्ट्रवादीन विश्वस्त म्हणून संधी दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
यावर खात्री करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद फाळके यांना संपर्क केला असता, त्यांनी अशा निवडी अद्याप तरी झाल्या नाहीत,
झाल्या असतील तर मला तरी काही माहिती नाही, असे सांगितले, त्यामुळे पक्ष्याच्या एका जबाबदार पदाधिकार्याला याबाबत माहिती नसल्याचे समोर आल्याने जनतेत आणखी संभ्रम वाढला.
यातून, अशी कोणतीही नावे जाहीर झालेली नाहीत, असेचं संकेत मिळत होते.मात्र, व्हाट्सअप ग्रुपवर ही नावे थांबण्याची नावं घेत नव्हते, पोस्ट फॉर्वड सुरूचं होते.
दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित नावांची पोस्ट वाचली असता त्यांनाही आश्चर्य वाटले, त्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना’ ही नावे चुकीची आहेत’
असे सांगून जनतेचा संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे अजून कोणतीही अधिकृत निवड झालेली नसून, ‘ती’ 6 नावे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम