‘त्या’ खून प्रकरणी हलगर्जीपणा भोवला! पोलिस निरीक्षकाची बदली तर सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकजण निलंबित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाट्यावरील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या खून प्रकरणी फिर्याद घेण्यास हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

तर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस नाईक शिवनाथ बडे यांचे निलंबन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छद्रिं फुंदे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपक ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. यांची जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित सपोनि राठोड व पोलिस कर्मचारी बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याणविशाखापटणम महामार्गावरील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छद्रिं कारभारी फुंदे यांचा खून केल्या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

सुधीर संभाजी सिरसाठ, आकाश पांडुरंग वारे, आकाश मोहन डुकरे, गणेश सोन्याबापु जाधव अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता.राहुरी ) परिसरातील डोंगरांमध्ये त्याच्या साथीदारांसह लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कानडगाव परिसरातची माहिती घेऊन सापळा लावला. या दरम्यान डोंगरांमध्ये पाठलाग करून आरोपी सिरसाठ, वारे, डुकरे व जाधव यांना पकडण्यात आले. या आरोपींना पोलीस खाक्या दाखविताच पळून गेलेल्याचे केतन जाधव ( रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी) असे त्याचे नाव सांगितले. तसेच गुन्हा केल्याची माहिती दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe