राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली. तर, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे

दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेले असून विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे.

मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआनं 5 दिवसात पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला.

यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी त्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत राजीनामा दिला.

अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड.

जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत.

त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe