अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर राहत असलेल्या तरुणाचा सुपा परिसरात (ता.पारनेर) येथे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर वास्तव्यास असलेला वाहिद पठाण या तरुणाचा 28 जून रोजी विवाह संपन्न झाला होता.
वाहिद हा सुपा येथे आपल्या सासुरवाडीला पत्नी शाजिया हिला आणण्यासाठी गेला असता सायंकाळी परत माघारी राहुरी फॅक्टरी येथे आपल्या घरी परतत असताना सुपा- नगर मार्गावर त्यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.
यात वाहिद पठाण हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तर पत्नी, चालक जखमी असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
वाहिद याच्या मृत्यूची बातमी समजताच मित्र परिवाराने सोशल मीडियावर श्रध्दांजली पोस्ट टाकून दुःख व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम