अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- अवघ्या सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय अश्विनी गौतम नरोडे या नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचविहीरे येथे घडली. मात्र ही आत्महतया नसून पती, सासरा आणि दोन सासू यांनी अश्विनी हिस बुधवारी पहाटे घरात मारुन शेत तळ्यात टाकले व आत्महत्या केल्याचा बनाव केला.
तसेच पोलिसांना याबाबत माहिती न देताच व पंचनामा न करता परस्पर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यावरुन अश्विनीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा आरोप अश्विनीचे वडील व चुलते यांनी केला आहे. येथील अश्विनी नरोडे (वय-२०) या विवाहित तरुणीने बुधवारी सकाळी ७ वाजण्यापूर्वी आत्महत्या केली असल्याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनीचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले यांनी सांगितले की, सुरुवातीचे दोन महिने सर्वकाही व्यवस्थित होते. त्यानंतर मुलीस त्रास देण्यास सुरवात झाली. याबाबत तिने आम्हाला वेळोवेळी सांगितले, आम्ही सर्वांनी समजावून सांगितले पण त्याचा उपयोग झाला नाही. अश्विनीने बुधवारी पहाटे ४.३० वाजता मोबाईलवर संदेश पाठवला मला हे सर्वजण मारहाण करीत असून, मला मारुन टाकतील.
हा संदेश वाचण्यापूर्वीच अश्विनीचे सासरे विजय शंकर नरोडे यांनी अश्विनीने आत्महत्या केली असे फोनवरुन सांगीतले. चुलते माधव दादासाहेब मिजगुले यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री ११ वा. अश्विनीने मला फोन करुन सांगितले होते की मला शारीरीक व मानसिक त्रास दिला जात आहे.
तीची समजुत काढुन मी सकाळी येतो असे सांगितले पण त्यापूर्वीच आश्विनीच्या आत्महत्येची बातमी समजली अश्विनीने आत्महत्या केली होती तर तिच्या घरच्यांनी पोलिसांना खबर का दिली नाही. पंचनामा केला नाही. परस्पर मृतदेह शवविच्छेदनासाठी का नेला. याबाबत आम्हाला शंका आहे.
अश्विनी हिस पहाटेच्या सुमारास मारुन शेततळ्यात टाकले. याप्रकरणी आश्विनीचा पती गौतम विजय नरोडे, सासरा विजय शंकर नरोडे, सासु सोनाली विजय नरोडे, सावत्र सासु प्रतिभा विजय नरोडे आदी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी माधव मिजगुले यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|