अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (यु.) चे खासदार अजय मंडल बेपत्ता झाले होते. कोरोना त्सुनामी आणि श्वासोच्छवासाच्या त्रासापायी ते अंडरग्राऊंड झाले. यामुळे त्यांच्याबाबत कुणाला काहीही माहिती नव्हती.
यामुळे त्यांच्या मृत्यूची अफवा सर्वत्र पसरली. याबाबतची माहिती जेव्हा खासदार मंडल यांना मिळाली, तेव्हा ते माध्यमांसमोर आले. आपण जिवंत असून कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत होतो. यामुळे जनतेपासून दूर होतो, असे कारण त्यांनी सांगितले.
कोरोना संकटात आम्ही बाहेर पडून आपला जीव द्यावा का? यंत्रणेची जबाबदारी सरकारची आहे. मी त्याचा एक भाग आहे.
जे शक्य आहे, ते आम्ही करीत आहो. गेल्या काही दिवसांपासून मी कुणाला दिसलो नसलो तरी, अनेकांना मदत केली. मला दररोज शेकडो फोन येत होते.
बेड, ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, अशी फोनवरून विनवणी केली जात होती. मला शक्य होती, तेवढी मदत मी केली, मात्र त्याचा गवगवा केला नाही अस अजय मंडल म्हणाले. यावेळी खासदार मंडल यांनी कोरोना नायनाटाबाबत मोठा दावा केला.
जनतेने ठरवले तर 21 दिवसांत कोरोनाचा समूळ नायनाट होऊ शकतो, असे ते म्हणाले. कोरोना चेन आपण तोडू शकतो. गर्दी केली नाही, तर कोरोनाही राहणार नाही, असा दावा करत प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला मदत करणे शक्य नाही, असेही मंडल यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात आम्हीही मदत केली. मात्र, त्याचा गवगवा सोशल मीडियावर केले नाही, असे मंडल यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम