अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील जिरायती भागाला वरदान ठरणार्या निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र कालव्यांअभावी लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
या प्रलंबित अंत्य कालव्यांचे गेल्या महिन्यात दोनदा भूमिपूजन झाले. मात्र अद्याप या कामाला सुरवात झालेली नसल्याने लाभधारकांमधुन संताप व्यक्त होत आहे. कालव्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद झालेली आहे.
आ. सदाशिव लोखंडे व निळवंडे कृती समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या कालव्याच्या भूमीपुजनही झाले. लॉकडाऊनचे उल्लघन झाले म्हणून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. मात्र याला महिना झाला मात्र तरीही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये संभ्रम तयार झाला असून नेमक काम बंद पडण्यामागील भूमिका व वस्तुस्थिती काय? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. दरम्यान नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाला भेट दिली होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्यसमोर अनेक अडचणी असल्या तरी निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्याला आमचं प्राधान्य आहे.
कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटेल. उदघाटन झाले, घोषणा झाल्या आता वस्तुस्थितीत काम कधी सुरु होणार आणि पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम