अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोरोना आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली, परंतु महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १३३ (अ) नुसार ‘नैसर्गिक आपत्ती’मध्ये कोविड १९ हा विषाणूजन्य आजार (साथरोग) असल्याने तो या कलमानुसार नैसर्गिक आपत्तीच्या व्याख्येत लागू होत नाही.
त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी माफ करता येणार नाही, असे मनपा उपायुक्त (कर) यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना आपत्ती काळातील कलम १३३ (अ) नुसार घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी आंदोलने, निवेदने इत्यादी मार्गाने महापालिकेकडे केली होती.
त्यानुसार दि.२७ ऑगस्ट रोजी अहमदनगर महानगरपालिकेने उबेद याबाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे की, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १३३ (अ) नुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये कोरोना हा विषाणूजन्य आजार (साथरोग) असल्याने कलम १३३ (अ) नुसार नैसर्गिक आपत्ती या व्याख्येत लागू होत नसल्यामुळे महानगरपालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करता येणार नाही. असे महापालिकेचे उपायुक्त (कर) यांनी स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारे झालेल्या आंदोलनामुळे आणि घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन त्याचे परिणाम घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचे परिणाम शहराच्या विकासावर सुद्धा झाले असते. मात्र मनपाच्या आता या खुलाशामुळे घरपट्टी, पाणीपट्टी भरावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम