अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार निलेश लंके यांच्यावर रोष असल्याचे समोर आले होते.
मात्र कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे. कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालत असतो, असे सांगत निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी निलेश लंके यांना धीर दिला आहे.
निलेश लंके यांनी उभारलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी इंदोरीकर महाराजांनी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीतून झालेल्या आरोपंकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
याआधी आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ‘असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
यावेळी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत निलेश लंके यांनी अण्णांना दाखवली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम