अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पाथर्डी व नगर तालुक्यातील 33 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईनमधून पाणीचोरी करणार्या सात व्यक्तींना या योजनेच्या कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडले.
प्रादेशिक नळ योजनेच्या पाईपलाईन व एअरवॉलमधून अनधिकृतपणे कनेक्शन घेणार्या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोणीही मुख्य पाईपलाईन अथवा एअरवॉलची छेडछाड करू नये असे आवाहन योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी केले आहे.
पाऊस लांबल्याने या योजनेअंतर्गत येणार्या अनेक गावांची पाण्याची मागणी वाढली होती. याबाबत लोकप्रतिनिधी व मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित योजनेच्या अधिकारी-कर्मचार्यांची बैठक घेतली होती.
योजनेमध्ये येणार्या तांत्रिक अडचणी दूर करत मुळा धरणापासून पांढरीच्या पुलापर्यंत मुख्य पाईपलाईन व एअरवालमधून पाणी चोरी होते का, एअरवॉल लिक आहेत का, याची खातरजमा करण्याच्या स्पष्ट सूचना तनपुरेंनी दिल्या.
तसेच पाईपलाईनमधून कोणी अनधिकृतपणे पाणी चोरी करताना आढळून आल्यास तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना तनपुरे यांनी अधिकारी-कर्मचार्यांना केल्या होत्या.
त्यानुसार कात्रड येथील सहा व उदलमलयेथील एका व्यक्तीने मुख्य पाईपलाईनला अनधिकृतपणे कनेक्शन घेऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी देखील पाणी वापरले असल्याचे आढळून आले.
यावर या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत पाणी चोरी करणाऱ्या सात जणांना रंगेहाथ पकडले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम