अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या धोरणानुसार ५५ लिटर प्रमाणे कुटुंबाला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छ्ता टिकून रहावी.
यासाठी कोबो टूलच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाइन करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यभरात “गाव विकास कृती आराखडा” निर्मिती साठी विशेष अभियानाची अंमलबजावणी चालू आहे.

या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परीषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक, जलसूरक्षक, आशाताई, अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले.
गाव कृती आराखडा माध्यमातून शाळा , अंगणवाडीत असलेल्या नळजोडणी गावातील प्रमुख पिके तसेच येणाऱ्या काळात गावातील कुटुंबांना लागणारे पाणी गावची लोकसंख्या जनावरांची संख्या अशा वेगवेगळ्या घटकांचे नियोजन करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम