अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परीसरात बिबट्याने धुमाकुळ घातला असून, अनेक शेळ्या फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भातकुडगाव येथील माजी सरपंच फटांगरे यांच्या घराशेजारी शेळीपालन शेड केले आहे. या शेडच्या चोहीबाजुने चार फुट उंचीची जाळी लावली आहे.
मात्र असे असताना देखील या जाळीवरून उडी मारत बिबट्याने शेळीला उचलून जवळच असलेल्या पिंपरीच्या झाडावर नेऊन फस्त केली.
जाळीच्या कंपाऊंडवरून उडी मारून शेळीची शिकार केल्याने परीसरातील शेतकऱ्यात चांगलीच भीती पसरली आहे. सध्या परीसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून लपण्यासाठी जागा सल्याने वन्य प्राण्यांचा धोका वाढला आहे.
पावसाने नुकतीच उघडीप दिल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे. मात्र बिबट्याच्या धाकाने जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम