अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- देशासह राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दररोज वाढणारी महागाई सर्वसामान्यांचे जगणे अवघड करत आहे.
मात्र रोज वाढणाऱ्या महागाई होरपळणाऱ्या नागरिकांचे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना काही देणेघेणे नाही. त्यामुळे वाढत्या महागाईवर कोणीच आवाज उठवत नाही. त्याचा परिणाम म्हणून आता टोल देखील वाढवण्यात आला आहे.
मागील वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यात अनेकांचे संसार उगड्यावर आले आहेत. अनेक कुटुंबे उध्दवस्त झाली आहेत. अनेक मुले आई वडीलांच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत.
एकीकडे असे विदारक चित्र आहे तर दुसरीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. या कठीण काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
आजच्या घडीला भाजीबरोबर स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेने तर कधीच शंभरी पार केली आहे. काही राज्यांत पेट्रोलने ११० रुपयांचा प्रति लिटरचा आकडा ओलांडला आहे.
त्यामुळे वाहनधारक पुरते वैतागले आहेत, हे सर्व कमी झाले होते कि काय म्हणून आता परत वाहनधारकांसाठी वाईट बातमी आली आहे. ती म्हणजे कोल्हापूर महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे.
कोल्हापूर आणि सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. किनी , तासवडे टोल नाक्यांवर ही दरवाढ करण्यात आली आहे. ५ रुपयांपासून२५ रुपयांपर्यंत ही टोल दरवाढ असणार आहे.
येत्या एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे. कोल्हापूर आणि सातारा या महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढीवर पाच रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कार जीप या वाहनांना पूर्वी ७५ तर आता ८० रुपये असे दर लागू केले असून हलक्या मालवाहतूक वाहनांसाठी १३५ ऐवजी १४५ रुपये मोजावे लागणार आहेत.
तर ट्रक, बस आणि कंटेनरला २६५ ऐवजी चक्क २९० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता वाहनधारकांची आवस्था ‘घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे’ अशी झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम