आता….तहसीलदार संघटनेने ‘त्या’ अहवालावरच घेतली शंका ..!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधींचा जाच आणि तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याचे सांगत आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लीप तयार केली होती.

त्याचे राज्यभर पडसाद उमटले. याच दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पूर्वीच देवरे यांच्याविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करून विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविला होता.

त्यामध्ये देवरे यांच्या कामात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र देवरे यांच्याविरुद्धच्या कसुरी अहवालासंबंधी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने गंभीर आरोप केला आहे. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तयार केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यामार्फत करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर लोकप्रतिनिधींच्या

दबावाखाली महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा करण्याचे प्रकार झाल्यास महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपून जाईल,अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी संघटनेतर्फे राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe