अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022Krushi news :- द्राक्ष बागेचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असून यंदा नुकसानीची तीव्रता दरवर्षी पेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.
त्यासाठी राज्य सरकार प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्याचा प्रयोग करणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर यामध्ये वाढ केली जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनीच सांगितले आहे.
राज्यातील द्राक्षाचे क्षेत्र हे देशात सर्वाधिक आहे.
त्यामुळे मागणीची पुर्तता करण्याची सर्वाधिक जबाबदारी आपल्या राज्यावरच आहे. राज्यात तब्बल 1 लाख 20 हेक्टरावर द्राक्ष बागा आहेत. यामध्ये सांगली, नाशिक भागात सर्वाधिक बागा आहेत.
वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बागेचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार 100 हेक्टरावरील बागांवर प्लॅस्टिक अच्छादन करणार आहे.
याकरिता एकरी 4 लाख 50 हजार एवढा खर्च येणार आहे. त्यामुळे लगेच यासाठीची योजना राबवणे तसे अवघड असल्याने पहिल्या टप्प्यात या प्रयोगाचे परिणाम काय होणार हे तपासले जाणार आहेत.