अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- जिल्ह्यासह गावपातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच गेल्या 24 तासात राहुरी तालुक्यात 25 कोरोनाबाधितांची भर पडली.
एकीकडे तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे तर दुसरीकडे तालुक्यात एक मोठी समस्यां निर्माण झाली आहे. राहुरी तालुक्यात कोविड चाचण्या करणाऱ्या एकमेव कर्मचाऱ्याची आज नगर येथे बदली झाली.
त्यामुळे कर्मचाऱ्याअभावी शासनाची मोफत कोरोना चाचणी सेवा खंडित होणार आहे. राहुरीतील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुभाष मोरे शासनाच्या मोफत कोरोना चाचणी प्रयोगशाळेत कार्यरत होते.
रोज 50 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी उद्यापासून (मंगळवार) नगर येथे जिल्हा रुग्णालयात हजर होण्याचा आदेश बजावला.
कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना शासनाने पूर्वीच सेवेतून दूर केले आहे. राहुरीतील प्रयोगशाळा सहायक सौरभ वाल्मीक यांना पूर्वीच नगर येथे,
तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वर इघे यांना साकूर येथे वर्ग केले आहे. एकमेव राहिलेले मोरे यांनाही नगरला बोलाविल्याने राहुरीतील कोरोना चाचण्या बंद पडणार आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|