अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- कोरोना व म्युकरमायोसिसच्या विळख्यातून अद्याप राज्यातील जनता पुरती सावरली नाही तोच आता परत एकदा राज्यासाठी धक्कादायक बातमी आहे.
मागील काही दिवसांपूर्वी केरळ राज्यातील एका गर्भवती महिलेला लागण झालेल्या झिका या रोगाचा आता राज्यात देखील शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण पुण्यात सापडला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण देखील पुण्यातच सापडला होता. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाचा हा पहिला रुग्ण सापडला आहे. सुदैवाने झिकाची बाधा झालेली ही महिला सुखरुप आहे.
या महिलेच्या कुटुंबियांनाही झिकाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या आजाराची बाधा झाल्याची माहिती दि.३० जुलैला संबंधित प्रयोगशाळेने दिली. दरम्यान या महिलेला झिकासोबत चिकनगुनिया देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम