अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या नियमांचे उल्लंघन करून भर रस्त्यात गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
या प्रकरणाची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी या तरुणासह ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन दिवसांपासून समाजमाध्यमवार एका भव्य वाढदिवस पार्टीची चित्रफित गाजत होती.
ओ शेठ….तुम्ही नादच केलाय थेट! या गाण्याच्या पार्श्वभूमीवर नालोसापारा पश्चिमेच्या चक्रधनर नगर येथे प्रसाद पवार या तरुणाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा कऱण्यात आला होता.
या वाढदिवसासाठी मोठी गर्दी जमविण्यात आली होती आणि रस्त्यात वाहनांवर केक कापण्यात आल्याचे दिसून येत होते. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी बर्थ डे बॉय तरुणासह ३५ जणांवर कलम २६८, २६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल केले
आहेत. या वाढदिवस पार्टीला दोनशे हून अधिक जणांची उपस्थिती होती असे पोलिसांनी सांगितले. इतर जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम