अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आता पर्यंत आपण सासरी महिलांचाच छळ केला जात असल्याचे पाहिले होते . अनेकदा या छळाला कंटाळून महिलांनी आत्महत्या देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र पुणे येथे चक्क सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल धोत्रे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वीच या मृत तरुणाचे लग्न झाले होते. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असे त्याने नमूद केले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं.
राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर तिथे मृत्यू पत्र म्हणून चिठ्ठी सापडली होती. यामुळे पुरुषांना देखील जाचाला समोर जावे लागत असल्याचे समोर आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम