अरे देवा!  या तालुक्यात आलेयं हे गंभीर संकट…?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- मागीलवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले,नदी,नाले.ओढे,तलाव दुथर्डी भरून वाहत होते. परिणामी कपाशीचे पीक आले. त्यानंतर कपाशी उपटुन दुबार पिके घेण्याकडे शेतकरी आकर्षिला गेला. गहु , हरबरा , मका आणि इतर चारा पिके करुन शेतकऱ्यांनी दुसाटा साधला.

यामध्ये नदीवर अवैध शेतीपंप टाकुन व विहीरीतील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे मात्र आता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वाईट वेळ येवून ठेपली आहे. रात्रंदिवस बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी देण्याची वेळ अतिपाणी उपस्यामुळे आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील  कुत्तरवाडी, मोहटा, मोहरी, घाटशिरस, विजविहरा (येळी), बोंदरवाडी, काळेवाडी, वडगाव, करोडी, मानेवाडी, माणिकदौंडी, पत्र्याचा तांडा, करंजी, शिराळ, मांडवे, कासाळवाडी, मिडसांगवी, भारजवाडी , अकोला येथे तलाव आहेत.

शिवाय यावर्षी तालुक्यातील  बहुतेक नद्या जानेवारी ते फेब्रुवारी महीन्यापर्यंत वाहत होत्या. मात्र अचानक नद्या व तलाव कोरडे पडु लागले आहेत. अवैध विजपंपांनी भरमसाठ पाणी उपसा केल्याने हे परीणाम आहेत. तलाव हे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असतात.

सरपंच व ग्रामसेवक हे स्थानिक पातळीवर काम करणारे असल्याने ते नागरीकावर कारवाई करण्यास काटकसर करतात. राजकीय लाभाच्या आशेने सरपंचही कटुता नको म्हणुन कारवाई टाळतात. त्यामुळे  अवैध पाणी उपसा रोखता आलेली नाही. परिणामी आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागणार हे निश्चीत.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर