अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राज्यात सुगंधी तंबाखू, गुटखा आदीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील अनेकजण छुप्या मार्गाने गुटखा विक्री करतात. नुकतीच नगरमध्ये पोलिसांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला होता.
यानंतर आता श्रीगोंदा पोलिसांनी तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एका किराणा दुकानात श्रीगोंदा पोलिस उपनिरिक्षक रणजित गट आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून लाखो रुपये किमतीची तंबाखू आणि सुपारीचा सुमारे १० गोण्या गुटखा जप्त केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील सार्थक किराणा दुकानात गुटख्याचा मोठा साठा केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना समजली.
त्यानुसार रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक रणजित गट यांनी कर्मचाऱ्यांसह या किराणा दुकानात जाऊन पाहणी केली असता.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे दिसून आले . त्यानुसार पोलिसांनी दुकानात असलेला तंबाखू आणि सुपारीच्या सुमारे १० गोण्या गुटखा जप्त केला. संबंधित किराणा दुकानदाराचा मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम