अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कारागृहात गंभीर गुन्ह्यांत अटक असलेल्या दोन कैद्यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले आहेत.
हा प्रकार पारनेर पोलिस ठाण्यात घडला असून, याप्रकरणी आरोपींना जेवण/भत्ता देणारा मोबाईल पुरवणारा सुभाष लोंढे, प्रविण देशमुख (रा.सुपा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे मोबाईल आढळून आले आहेत. उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या कारागृह झडती दरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस झाला आहे.
यासंबंधी पो. कॉ आप्पासाहेब सोपान डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की,दि. २५ मार्च रोजीचे सकाळी ८ वाजता मला पारनेर दुयम कारागृह येथे सेट्री ड्युटी होती. यावेळी दुय्यम कारागृहामध्ये ४४ पुरुष आरोपी बंदिस्त होते.
दि २५ मार्च रोजी रात्री १.०० वा. सुमारास पो.कॉ साठे हे सेट्री ड्यटी करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, दक्षिण जिल्हा रात्रगस्त दरम्यान पारनेर पोलीस स्टेशन येथे आले.
त्यांनी पारनेर दुयम कारागृहाची अचानक झडती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना कळवून तहसिलदार ज्योती देवरे यांना हजर राहण्याबाबत कळविले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे असे पोलीस स्टेशनला हजर झाले.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील तहसिलदार श्रीमती देवरे, पोलीस निरीक्षक घनशाम बळप, ठाणे अंमलदार पोहेकॉ कडुस, पो.ना गुजर, पो.कॉ साठे, पोका चौघुले, पोकॉ रोकडे, पोकॉ.दिवटे पोका यादव, पोना मोढवे,
पोका पाचारणे व मी अश्यांनी रात्री १.३०च्या सुमारास पारनेर दुयम कारागृहाची झडती घेतली असता बॅरक क्र ४ मधील न्यायालयीन कोठडीमधील आरोपी सौरभ गणेश पोटघन (वय २३ वर्ष) याच्या अंगझडतीत एक निळ्या रंगाचा मोबाईल व अविनाश निलेश कर्डीले (वय २३ वर्ष) याच्या अंगझडतीत एक पांढऱ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळुन आला.
हे मोबाईल दोन आरोपींकडे मिळुन आल्याने त्यांचेकडे मोबाईल हे कोणी दिले व ते कधीपासुन आहेत.
याबाबत वरीष्ठांनी चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाइल हे त्यांना जेवण/भत्ता देणारे सुभाष लोंढे, व प्रविण देशमुख यांनी पुरविल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|