अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- सेल्फी काढणे अनेकदा जिवावर बेतल्याचे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मावळमध्ये एक मुलाचा सेल्फी काढताना पाय घसरून तो पाण्यात पडल्यामुळे त्याला वाचवताना त्याचे वडील आणि मामाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मावळमध्ये घडली होती.
पुन्हा एकदा सेल्फीमुळे एका तरुणाला तब्बल २५ तास मृत्यूशी संघर्ष करावा लागल्याची घटना साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठाराजवळ घडली आहे. येथील यवतेश्वर जवळच्या गणेशखिंडीत हा प्रकार घडला.कनिष्क सचिन जांगळे असे त्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे कि,साताऱ्याच्या यादोगोपाळ परिसरात राहणारा कनिष्क जांगळे गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण आज शुक्रवारी सकाळपर्यंत देखील तो परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली.
गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ त्याची मोटारसायकल सापडल्यामुळे कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी अजून पुढे जाऊन पाहिल्यानंतर दरीत सुमारे ६०० फुटांवर कुणीतरी पडल्याचं दिसून आलं. सारा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलली आणि शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यु टीमला पाचारण केले.
दुपारपासून रेस्क्यु टीमने खोल पडलेल्या कनिष्कला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी टीममधील एक तरुण खोल दरीत उतरला. तो कनिष्कपर्यंत पोहोचला तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.
क्रेनच्या सहाय्याने कनिष्कला वर खेचले तो शुद्धीवर त्याने सांगितले कि, दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढाताना कनिष्कचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. तब्बल २५ तासानंतर त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













