अरे देवा: चोरट्यांनी चक्क सराफाचे दुकानच फोडले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- भर बाजारपेठेत असलेल्या सराफाच्या दुकानाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले.

तिजोरी फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्याने मोठा ऐवज चोरीला गेला नाही.ही घटना पुणतांबा येथे घडली आहे. येथील बाजारपेठेत महेश अरूण मैड यांचे योगेश अलंकार हे सराफी दुकान आहे.

चोरट्यांनी दुकानाचा लाकडी व लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व शोकेसमधील सोन्या चांदीचे मुरणी, पैंजण असा ६० ते ७० हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला.

यावेळी चोरट्यांनी दुकानात असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी न झाल्याने मोठा ऐवज वाचला.

मैड यांचे दुकान यापूर्वीही फोडले होते. मुख्य रस्त्यावर आणि भरवस्तीत असलेले दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

शेजारील दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांची संख्या चार असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!