अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देशविदेशातून दररोज मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे.
आतापर्यंत ५० लाख रूपये जमा झाले असून, गावागावांमधून विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे, अंडी, दुध आरोग्य केंद्रामध्ये आणून देण्यात येत आहे.
विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून आं. लंके यांच्या मोफत आरोग्य केंद्रांची महती देशभरासह सातासमुद्रापार पोहचल्यानंतर सर्व ठिकाणांवरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सेंट्रल बँकेतील खात्यावर अनेक नागरीक थेट मदत करीत आहे.
गुगल तसेच फोन पे च्या माध्यमातूनही दररोज लाखो रूपयांची मदत जमा होत आहे. या मदतीची संबंधित व्यक्तीला आयकरातून सुट मिळणार आहे. भाळवणीच्या आरोग्य केंद्रास भेट देउन अनेक नागरीक रोख रक्कम, धनादेश जमा करीत आहेत.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी तब्बल ६ लाखांपेक्षा जास्त मदत आ. लंके यांच्याकडे सूपूर्द केली आहे. सेवानिवृत्तांनीही मदतीचा हात देताना एक लाख रूपयांची मदत दिली. विदेशातून अनेक तरूण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत.
आ. लंके देवदुताप्रमाणे काम करीत आहेत. अनेक विधवा,वृद्ध, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी देखील आपल्या परीने मदत सुपूर्द केली आहे.
अनेक सामान्य नागरीकांच्या संकटात आ. लंके नेहमीच धावून गेल्याने आता त्यांनी सेवाभावी वृत्तीने सामान्य रूग्णांसाठी सुरू केलेल्या या आरोग्य मंदीरासाठी असे अनेक लोक शक्य ती मदत देउन उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|