अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या समाधी उत्सवानिमीत्त पारंपारीक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंखध्वनीच्या निनादात महापुजा संपन्न झाली.
यावेळी विश्र्वस्त, ग्रामस्थ उपस्थीत होते. कोरोनामुळे बाहेरगावच्या भाविकांना तेल लावण्याच्या विधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
त्यामुळे देवस्थान समिती सदस्य, पुजारी, ग्रामस्थ, चार बेटातील मानकरी यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची पुजा करुन तेल लावण्याच्या विधीस सुरवात केली. शुद्ध पंचमीला नाथांच्या संजीवन समाधीला तेल लावण्याचा विधी असतो.
कुंभारांकडुन मातीचे कोळंबे व पाच घट आणले जातात, त्यास नाडाबांधून त्यामध्ये तेल टाकले जाते. गुलाबपाणी दुध गंगाजल हळद चंदण पावडर बुक्का भस्म असे पदार्थ कालवुन नाथांच्या संजीवन समाधीला तेल लावण्याचा पांरपारीक विधी केला जातो.
तेल लावण्याची शेकडो वर्षाची परंपरा असुन, प्रत्येक देवतांच्या उत्सवापुर्वी शुभ व धार्मीक कार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासुन होतो. शरीर बुद्धी मन व कृती ईश्वराला समर्पीत करून सेवाकार्यला झोकुन देण्याचा प्रारंभ ग्रामस्थ तेल लावण्यापासुन करतात.तेल लावल्यानंतर आजपासुन गुढीपाडव्या पर्यंत मढी ग्रामस्त व्रतस्थ असतात.
देवाला तेल लावल्यानंतर मढी ग्रामस्त आजपासुन घरात गोडधोड, विवाह कार्यात जात नाही, शेतीची कामे बंद, दाढीकटींग,नवीन वस्त्र परिधान करत नाही, येवढेच नाहीतर स्वतःच्या घरात मंगल कार्य करत नाहीत. हा संपुर्ण यात्रा कालावधी भावीक व यात्रेकरूंच्या सेवेसाठी राखीव ठेवला जातो.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|