राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा अर्थ सांगितला आहे. यावेळी रोहित पवारांनी भाजपाला देखील चिमटा काढला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.”

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!” असे रोहित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News