अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यभर सर्वच सण उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात देखील नियमांचे पालन करत सण साजरा करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
यातच अनुषंगाने संगमनेर शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्ततैनात करण्यात आला आहे. या भागात पोलीस वाहने सातत्याने फिरत असल्याने शहरातील मुस्लिम बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी हा बंदोबस्त कमी केला नाही तर बकरी ईद साजरी करणार नाही असा इशारा काही पदाधिकार्यांनी दिला. तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये देताच पोलिसांनी सौम्य भूमिका घेतल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरा न करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
संगमनेर शहरात दरवर्षी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येते. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी संवेदनशील ठिकाणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो.
यावर्षी शहरातील सय्यद बाबा चौक,देवी गल्ली, बौद्ध मंदिर या ठिकाणा बरोबरच इतर ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील जमजम कॉलनी मध्ये स्वतंत्र तंबू उभारण्यात आला असून याठिकाणी काही पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी पोलीस वाहने सातत्याने फिरत आहे. पोलिसांचा वाढता बंदोबस्त व पोलीस वाहनांचे वाढत्या चकरा यामुळे शहरातील मुस्लिम बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस बंदोबस्त त्वरित कमी करावा अशी मागणी काही मुस्लीम नेत्यांनी पोलीस अधिकार्यांकडे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम