माजी पालकमंत्र्यांच्या टीकेवर रोहित पवार म्हणाले…त्यांच्या टीकेकडे दुर्लक्षच केलेलं बरं

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती.

यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण जुंपले होते. आत याच मुद्द्यावरून कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना शब्दिऊक उत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले कि, शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून टीका करणाऱ्यांनी ते नीट ऐकलेले दिसत नाही. या भाषणातून आणि यापूर्वीही पवारांनी अहिल्याबाई होळकर यांचा सन्मानच केला आहे.

या मतदारसंघातून निवडणूक लढण्यापूर्वीच त्यांनी मला अहिल्यादेवींबद्दल सांगून जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अहिल्यादेवींचा सन्मानच करत आलो आहोत,’ असे उत्तर प्रत्युत्तर रोहित पवार यांनी शिंदे यांना दिले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जेजुरीतील भाषणातील उल्लेखामुळे अहिल्यादेवींचा अपमान झाल्याची टीका शिंदे यांनी केली होती.

त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी ही माहिती दिली. एवढचे नाही तर जेव्हा मी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवायची ठरले तेव्हाच मला पवार यांनी अहिल्यादेवींची आठवण करून दिली होती.

या मतदारसंघातील चोंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. तेथे काम करण्याची तुला संधी मिळणार आहे. त्यांनी जसे पाणी आणि अन्य क्षेत्रांत काम करून जनतेची सेवा केली, त्यातून आदर्श घेऊन काम कर.

असा सल्ला मला पवार यांनी तेव्हाच दिला होता. मी आजही त्याच जबाबदारीने काम करीत आहे. त्यामुळे यासंबंधाने होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्षच केलेले बरे असे पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe