पक्षांतराच्या मुद्द्यावर कोते म्हणाले कि…विखे पाटील हाच आपला पक्ष

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-पक्षांतराच्या मुद्द्यावरून चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी या चर्चेला पूर्णविरामी देत या मुद्द्यावर खुलासा केला आहे.

राजकारणात कालही विखे पाटलांबरोबर होतो, आजही आहे आणी भविष्यातही विखे पाटील यांच्याबरोबरच राहाण्याची आपली भुमिका स्पष्ट आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

नुकत्याच नाशिक येथील एका खाजगी समारंभातील फोटोवरून शिर्डीत प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर कोते यांनी या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

नाशिक येथे विजयराव जगताप यांच्या मुलाच्या साखरपुड्यातील समारंभातील फ़ोटो वरून सोयीस्कर राजकीय अर्थ काढण्यात आला आहे.

फोटोवरून माझ्या शिवसेना प्रवेशाबाबत खोडसाळपणाने वावड्या उठवणार्‍या लोकांची किव करावीशी वाटते, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिर्डीतील काही पुढारी अशी खोडसाळपणाचे वृत्त पेरण्यास माहीर असुन आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आपल्यावर पुर्णपणे भरवसा आहे.

आपण कालही विखे पाटलांबरोबरच होतो, आजही आहे आणी भविष्यातही राहाणार आहेत. विखे पाटील हाच आपला पक्ष आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत विखे पाटील गटाचीच सत्ता पुन्हा येणार आहे. विरोधकांनी कितीही खोडसाळपणा केला तरी जनता विश्वास ठेवणार नाही. असे प्रतिपादन कैलास कोते यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe