एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी व त्यांनी खासदरकीच राजीनामा द्यावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उस्मानाबाद येथे केले.

खासदार आमदार पेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे आंदोलन करताना भाजपमध्ये राहुन दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य आहे अशी टीका केली.

छत्रपती संभाजी महाराज यांनी खासदारकीचा राजीनामा द्या आम्ही तुमच्या सोबत येऊ असे सांगत महाराजांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत होणाऱ्या धरणे आंदोलनात राजीनामा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले.

हर्षवर्धन जाधव घटना दुरुस्तीसाठी दिल्लीत ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षणबाबत महाराज यांची भूमिका अनेकांना कळली नाही, घटनादुरुस्ती करावी यासाठी त्यांनी भाजपला त्यांच्या पक्षाचे खासदार म्हणून तयार करावे.

मदत नाही केली तर अशा पक्षाचा खासदार राहण्यात काय अर्थ आहे. एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे हे विरोधाभास करणारे आहे.

ज्या पद्धतीने मी मराठा आरक्षणसाठी आमदारकीचा राजीनामा दिला त्याच प्रकारे त्यांनी खासदरकीच राजीनामा द्या व त्याला लाथ मारावी. महाराज जी छत्रपतीची गादी चालवत आहेत त्यासमोर आमदार खासदार की कमी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!