जिल्ह्यात परत एकदा कांदा कोसळला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  गेल्या काही आठवड्यात नगर जिल्ह्यात कांद्याला विविध ठिकाच्या बाजार समितीत चांगला भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळत होते.

मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगर जिल्ह्यातील कांद्याला परराज्यात मोठी मागणी असते, मात्र अचानक हे भाव कमी झाले आहे. आंधप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यातून कांद्याला चांगली मागणी असते.

मात्र अचानक भाव कमी होत आहेत. काल जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केट मध्ये कांद्याच्या भावात पुन्हा घसरण झाली असून काल बुधवारी जास्तीत जास्त भाव २६०० रुपयापर्यंत मिळाले.

काल एक नंबरच्या कांद्याला २५०० ते २६०० रुपये भाव मिळाला दोन नंबरला १९०० ते २००० रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते १००० रुपये जोड कांद्याला ५०० ते १००० रुपये तर उलटी कांद्याला १९०० ते २२०० रुपये भाव मिळाला.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe