परमीट चालकालाच लावला दीड लाखाला चूना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- दिवसभर परमीट रूमचे जमा झालेली १ लाख ६० हजारांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी ठेवलेली पिशवीच अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल जयश्री परमिट रूमसमोर घडली.

याबाबत अमोल पाचपुते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे असलेल्या

हॉटेल जयश्री परमिट रुमचा भरना करण्यासाठी फिर्यादी अमोल माणिकराव पाचपुते यांनी एका पिशवीत १ लाख ६० हजार रूपये रोख रक्कम ठेवली होती.

व ही पिशवी घेवून ते भरना करण्यासाठी बँकेत जाणार होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी त्यांची ही पैसे ठेवलेली पिशवीच उचलून पसार झाला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी एका चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe