अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
आता याच कर्जप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने योगेश मालपाणी याला आज अटक केली आहे. अटक केल्यानंतर मालपाणी याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या माहितीला दुजोरा दिला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/06/Arrest.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या मशिनरींचा पुरवठा योगेश मालपाणी याच्यामार्फत झाला होता, हे तपासात पुढे आले आहे. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम