अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकास अटक केली. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हुसेननगर, जगताप मळा, वार्ड नंबर एक याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.शहरातील हुसेननगर, जगताप मळा,
वार्ड नंबर एक या ठिकाणी आरोपी बळीराम ऊर्फ बल्ली यादव (वय ३०, रा. सरस्वती कॉलनी, वार्ड नंबर ७, श्रीरामपूर) हा गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी मंगळवार, दि. १४ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सापळा रचून यादव याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ४० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा मोटरसायकल असा ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गु.र.नं. २४८/२०२१ नुसार आर्म ॲक्ट ३, ५, ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास मुख्य हवालदार जोसेफ साळवे करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|