दुचाकीवरून पडून एक ठार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरातील रेल्वे उडड्डानपुलाजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्यामुळे गाडीवरून पडून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली.

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाहनिमित्त निकटवर्तीय नातेवाईक अमोल हरीभाऊ राऊत (वय २३) व तरुण कांदळकर (वय १८) दोघे सामानाची ने आण करण्यासाठी धावपळ करत होते.

त्यासाठी ते दुचाकीवरून नेवासा रोडवरील रेल्वे उड्डानपुलावरून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना हुल दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले.

यात दोघांनाही जबर मार लागला. यातील अमोल राऊत हा जागेवरच गतप्राण झाला तर कांदळकर यास जबर मार लागला. बराच वेळ रस्त्यावर दोघेही तरुण पडून राहिल्याने त्यांना लवकर उपचार मिळाले नाहीत.

घटना समजल्यानंतर नातेवाईकांच्या सामोपचाराने साध्या पद्धतीने लग्न सोहळा उरकण्यात आला. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe