अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे शनिवार, दि. ६ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, जेऊर येथील जरेवस्ती परिसरात रात्री एकच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पायी चाललेले प्रदीप अरविंद धीवर (वय ४५, रा. आशीर्वादनगर, श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी पोलीस हवालदार रमेश थोरवे व पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर आज श्रीरामपूर येथील ख्रिस्ती दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News