अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बस स्थानकात मध्यरात्री बसस्थानकात प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नितीन संजय जाधव (रा. आळकुटी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी, हिंगोली येथील निलेश जाधव हे नारायणगाव बस स्थानकात त्याचे दोन साथीदार बसची वाट पाहत बसले होते.

file photo
एक अज्ञात इसम तेथे आला व चाकूचा धाक दाखवून खिशातील १६०० रुपये हिसकावून घेत पळून गेले.
याबाबत माहिती मिळताच तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवून त्याचा शोध घेतला असता
नारायणगाव येथे एका दुकानासमोर बसलेल्या आरोपीला फिर्यादीने ओळखले. पोलिसांनी त्याला अटक करून झडती घेतली असता त्याच्या जवळ १६०० रुपये मिळाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम