मांडूळाची तस्करी करणाऱ्या एकाला पकडले तिघे मात्र फरार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-मांडूळाची तस्करी करणाऱ्या एकाला कर्जतमधील वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र 3 आरोपी फरार आहे. या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांनी कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे वन्यजीव मांडूळाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तात्काळ वनविभागाच्या पथकाला सूचना दिल्या त्यानुसार वनविभागाचे अधिकारी – कर्मचारी साध्या वेशात नवसरवाडी येथे गेले.

घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गिन्हाईक म्हणून संबंधीत इसमांकडे गेल्यानंतर ४ व्यक्तींकडे १ मांडूळ असल्याची खात्री झाली. व्यवहार ठरला सात लाखांचा व रक्कम देण्याचे मान्य केले.

त्या अज्ञात ४ व्यक्तीपैकी दोघांनी घरी जाऊन एक मांडूळ आणले. मुद्देमाल मांडूळ व आरोपी यांची खात्री होताच आरोपी विशाल सुर्यभान धनवटे, वय २५ वर्षे, रा. नवसरवाडी ता. कर्जत व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

दरम्यान ३ आरोपी मोटारसायकलवरुन पळुन जाण्यात यशस्वी झाले. वनकर्मचाऱ्यांनी मांडूळाचे वजन केले असता ते १.१५ किलो वजनाचे आढळून आले.

वनविभागाने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ७ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe