सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकजण निलंबित

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

तर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस नाईक शिवनाथ बडे यांचे निलंबन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे खून प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याणविशाखापटणम महामार्गावरील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांचा खून केल्या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

सुधीर संभाजी सिरसाठ, आकाश पांडुरंग वारे, आकाश मोहन डुकरे, गणेश सोन्याबापु जाधव अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांना आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता.राहुरी ) परिसरातील डोंगरांमध्ये त्याच्या साथीदारांसह लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कानडगाव परिसरातची माहिती घेऊन सापळा लावला. या दरम्यान डोंगरांमध्ये पाठलाग करून आरोपी सिरसाठ, वारे, डुकरे व जाधव यांना पकडण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News