धरणात बुडून एक युवकाचा मृत्यू तर दुसऱ्याला वाचविण्यात यश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथे मुळा धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झला तर दुसऱ्या तरुणास वाचविण्यास यश आल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. 15 ऑगस्ट रोजी मुळाधरण परिसरात बरेच हौशी पर्यटक आले होते.

त्यामध्ये राहुरी शहरातील तरुण फिरण्यासाठी आले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.त्यातील एक जण बुडाला. तर दुसऱ्या तरुणाला गावातील भोई समाजाचे नेते शक्तीलाल गंगे यांचे बंधू विकास गंगे आणि इंद्रजीत गंगे या दोन्ही तरुणांनी धाडस दाखवून वीरेंद्र सिंघराथम या तरुणाला वाचवले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर सलीम भाई शेख यांनी पोलिस प्रशासनास माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले.घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोकील साहेब, कॉन्स्टेबल चव्हाण दादा, जाधव दादा,मोराळे दादाघटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर सलीम भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मृत तरुणाला गावातील मच्छीमार करणारे आदिवासी व भोईसमाजाच्या तरुणांनी पाण्या बाहेर काढण्यासाठी शोधकार्य सुरू केले आहे,तसेच आदिवासी नेते दिलीप बर्डे यांनीही सहकार्य केले. यामध्ये विकास गंगे, अशोक गायकवाड ,

शक्तीलाल गंगे,चंदू बर्डे, लहू बर्डे,किशोर बर्डे, करण सूर्यवंशी, बाळू मामा, हर्जित माळी, सुनील माळी,सोनवणे पाहुणे, संगम परदेशी, रमेश गंगे,सुनील पवार,सुरेश बर्डे, शिवा मामा, दीपक नवसारे,मल्हारी, अरुण पवार,राहूल परदेशी,आदेश गंगे, आकाश गंगे,किशोर पवार,साहिल शेख,नागेश पवार इत्यादि तरुण प्रयत्न करीत आहे.

विकास गंगे आणि इंद्रजीत गंगे या दोन्ही तरुणांनी दाखवल्या धाडसाबद्दल तसेच गावातील तरुणांचे पोलीस प्रशासन तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलीमभाई शेख यांनी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News