रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि महाराष्ट्रातील नागरीकांचे प्राण वाचवण्यासाठी रेमडीसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करावी, महाराष्ट्रातील १८ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना कोविड लसीकरण मोहीम राबवावी.

जास्तीत जास्त बेड उपलब्ध करुन द्यावेत व २१ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे राज्याचे मुख्य समन्वयक सोमनाथराव नवले यांनी केली आहे.

नवले यांनी पत्रकात म्हटले आहे की, महाष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांच्या उपचारात देण्यात येणारे प्रभावी इंजेक्शन म्हणून रेमडेसिवीर ओळखले जाते.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे इंजेक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असुन अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात त्रस्त असल्याचे चित्र समोर येत आहे.

कोरोनावर प्रभावीपणे काम करणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची अनेक औषध विक्रेते व स्टॉकीस्ट कृत्रिम टंचाई निर्माण करुन रुग्णांच्या आडचणीत अजून भर घालत आहेत.

होमक्वारंटाईन असलेल्या नागरीकांना देण्यात येत असलेल्या टॅमिफ्लुच्या गोळ्यांचाही कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. राज्यात ऑक्सिनचा पुरेसा साठा नसुन त्याचाही तुटवडा आहे.

राज्यातील कोविड लसिकरण मोहिमेचा बोजवारा उडाला असुन चार चार दिवस लस उपलब्ध होत नाही. नागरिक लसिकरण केंद्रात हेलपाटे मारत आहेत.

तरी जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन महाराष्ट्रातील १८ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना सरसकट लसिकरण करण्यात यावं, तसेच २१ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात यावा.

या मागण्यांची दखल घेतली नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा नवले यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe