केवळ दैवबलवत्तर म्हणून ‘ते’ तिघेजण बचावले?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- गुजरात येथील तिन तरूण भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात होते. मात्र त्यांच्या कारला अपघात होवून ती तब्बल ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात केवळ देवाच्या कृपेनचे ते तिघे तरूण वाचले.ही घटना संगमनेर तालुक्यात घडली.

याबाबत सविस्तर असे की, देवदर्शनासाठी गुजरात येथून भीमाशंकराला कारने जात होते. सकाळी सहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर माहुली घाटातून ही कार जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट महामार्ग सोडून ६० ते ६५ फुट खोल दरीत कोसळली.

कोसळताना कारने जवळपास पाच पलटी घेतल्या. या भागात ठिकठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत. केवळ दैवबलवत्तर हे तिघे तरुण बालंबाल बचावले आहेत. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. ही घटना रविवारी ७ मार्च रोजी सकाळी सहा वाजता घडली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe