अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- एकीकडे वाढती महागाई,कोरोना तर दुसरीकडे शेतमालाला अत्यल्प दर या भयानक अवस्थेत असताना उन्हातान्हात काबाड कष्ट करून पिकवलेले धान्य पदरात पडू न देण्याचे अत्यंत वाईट कृत्य काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांच्या शेवगाव-गेवराई महामार्गलगतच असणाऱ्या आर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील काढणी केलेल्या शेतात पसरलेल्या अवस्थेत असलेल्या गव्हाच्या पेंढ्या एका जागेवर जमा करून तो ढिगारा रात्रीच काही अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदरील घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांची तीन एकर शेतजमीन बालमटाकळी शिवारात शेवगाव-गेवराई महामार्गालगतच असून सदरील जमीन ही कसण्यासाठी ( बटाईने ) बालमटाकळी येथील शेतकरी दिगंबर टोके यांनी केलेली आहे.
तसेच टोके यांनी या जमिनीवर उत्तम प्रकारे गव्हाचे पीक पोटच्या मुलासारखे तसेच तळ हाताच्या फोडा प्रमाणे तीन ते चार महिने रात्र दिवस काबाड कष्ट करून उसनवारी पैसे गोळापोलिसांनी घटनास्थळाला भेटदेवून पाहणी केली आहे.पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
- #Former Union Minister Dilip Gandhi dies