अरेरे! शेवटी कांद्याने वांधा केलाच ! महिन्याभरात दर निम्मे घसरले 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कांद्याने प्रचंड झेप घेत शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. मोठ्या कालखंडानंतर कांद्याला चांगले दर मिळाल्याने बळीराजा सुखावला होता.  मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.कारण नंतरच्या काळात अवघ्या एक महिन्यात कांदा प्रचंड कोसळून आता अवघा १५०० रुपये दर मिळत आहे.

या अल्प दरामुळे शेतकऱ्यांना झालेला खर्च देखील हातात पडत नसल्याने शेवटी कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केलाच असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतातील उभी पिके डोळ्यासमोर नष्ट झाली होती. त्यानंतर कांद्याच्या बियाणांच्या प्रचंड किमती वाढल्या होत्या.

तरी देखील शेतकऱ्यांनी ही महागडी बियाणे खरदी केली. मात्र यातील अवघे ५० टक्के बियाणे उगवले नाही. नंतरच्या काळात परत झालेल्या पाऊस व वातवरणात झालेल्या बदलांमुळे हातात आलेली अत्यल्प पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारली यासाठी खर्च देखील मोठा आला आहे.

त्यावेळी कांद्याला मिळत असलेला दर पाहता आपला हा खर्च वाया जाणार नाही अशी खात्री होती. मात्र आता मिळत असलेले दर पहाता नफा तर सोडा पण झालेला खर्च देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील नगरसह पारनेर ,नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये  कांद्याला अवघा १५०० ते १६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. महिन्यापूर्वी पूर्वीच्या तुलनेत कांद्याच्या भावातील ही अर्धी  घट झाली आहे.

गेल्या महिनाभरात अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला चांगला भाव मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद बघायला मिळत होता पण तेच भावा आता महिनाभरानंतर निम्म्यावर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घोडेगाव कांदा मार्केट मध्ये काल कांद्याची आवक तीस हजार ८८५  गोणी इतकी झाली.

यात एक नंबरच्या कांद्याला १५००  ते १६००  रुपये भाव मिळाला.दोन नंबरच्या कांद्याला १३०० ते १४००  रुपये मध्ये तीन नंबरच्या कांद्याला एक हजार दोनशे ते १३००  रुपये कांद्याला भाव मिळाला तर जोड कांद्याला ६००  ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला कांद्याला ९००  ते १२००  रुपये भाव मिळाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe