अरेरे! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील उद्धव कानिफनाथ शेळके (वय २५) या तरुणाने कासार पिंपळगाव हद्दीतील नगर शेवगाव रोड वरील फॉरेस्ट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

साधारणपणे दुपारी ही घटना घडली. सायंकाळी गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी सदर घटनेची खबर मोबाईल वरून सर्वत्र पसरवल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती.

या तरुणाच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क काढत होते. नेमके त्याने का आत्महत्या केली याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

उद्धव शेळके हा पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घरून निघताना महाविद्यालयात जातो असे सांगून गेला.

परंतु तो महाविद्यालयात न जाता दुकानातून नायलॉनची दोरी खरेदी करून महविद्यालायापासून १ किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेल शेजारील दऱ्या खोऱ्याचा परिसर असलेल्या

भागात गेला व कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी अशा झाडाची निवड करून त्या झाडाला गळफास घेतला. गळफास घेतलेल्या झाडाजवळच त्याचे दुचाकी वाहन आढळून आले.

शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने का आत्महत्या करावी हे एक न समजणारे कोडे आहे. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe