अरेरे ! प्रवरा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील आंबी-अंमळनेर हद्दीतील नदीपात्रात मळीसदृश विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून मृत माशांचा तवंग नदीकाठी साचला आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे. प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रवणात पाण्याची आवक वाढली आहे. हे पाणी मोठ्या प्रमाणात दुषित असून त्यामध्ये मळीसदृश विषारी पदार्थ मिसळला गेल्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे पाण्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असुन त्याची दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न व जनजागृती केली जात आहे.

दुसरीकडे विषारी व मळीमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडून शासनाच्या प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात असल्याचे चित्र सध्या प्रवरा पट्ट्यात दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी असाच प्रकार प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात झाला होता. तेथेही विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले होते.

गंगापूरचे सरपंच सतिष खांडके यांनी हा मुद्दा लावून धरत प्रशासनाला धारेवर धरले होते. तसाच प्रकार पुन्हा आंबी-अंमळनेर भागात निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरणात पसरले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe