अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- महाविकास आघाडी सरकारचे वसुलीकडे लक्ष आहे. बार दारु, इतर दुकाने सुरु आहेत, राजकीय कार्यक्रम सुरु आहेत, सर्व काही सुरळीत आहे.
तरी देखील भारतातील सर्व देवस्थाने उघडी असतांना महाराष्ट्रातील साई मंदिर पुर्णपणे सुरक्षित असतांना ऑनलाईन बुकिंगद्वारे व ज्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहेत या नियम अटीसह का उघडत नाही ? असा सवाल भा.ज.युवा मोर्चा प्रदेशउपाध्यक्ष तथा माजी विश्वस्त सचिनतांबे यांनी उपस्थित केला आहे.
भारतातील सर्व राज्यातील मंदिरे खुली झालेली असतांना देखील अजून पर्यंत जाणीवपूर्वक मंदिरे खुली करण्यास परवानगी देत नाही. देशविदेशातील साईभक्तांच्या भावना पायदळी तुडवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरे उघडा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा तांबे यांनी सरकारला दिला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याकारणाने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण पुर्णतः ठप्प झालेले आहे. त्यामुळे शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार प्रसाद विक्रेते, ट्रॅव्हल्सवाले, फुलाचे शेतकरी, चहा नाष्टा विक्रेते व इतर हातावर उपजिविका असणार्या प्रत्येकाला अतिशय गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे.
कर्जाची हप्ते थकल्याने अनेक हॉटेल, घर, दुकाने सील केली जात आहेत. शिर्डी नगरपंचायतने मंदिरे बंद असल्याकारणाने सरकारला घरपट्टी, पाणीपट्टी वेगवेगळे कर कमी करण्यासाठी प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली.
परंतु कुठलाही निर्णय या सरकारने दिलेला नाही. मंदिरे पुर्णतः बंद असल्याने या करांमध्ये विशेष बाब म्हणून सवलत द्यावी अशी मागणी संबंधीत मंत्र्याकडे बैठकीत मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम